मृतक चिमुकल्याला न्याय मिळावा यासाठी पालकांची पायपीट…

0
40

एक हजार पेक्षा जास्त पालकांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सोपविले…

(प्रतिनिधी- सचिन मुर्तडकर):- गेल्या २३ फेब्रुवारीला अली पब्लिक शाळेतील अहमद रजा बेग हा ५ वर्षे वयाचा चिमुकला शाळेच्या आवारात खेळताना पडला होता. या घटनेची माहिती त्याच्या पालकाला देण्यात आली नसल्याने त्याकडे गांभीर्याने पाहले गेले नाही. परिणामी तो चिमुकला उशिरा रात्री गतप्राण झाला. त्यानंतर पालकांनि आपला रोष व्यक्त करीत पोलीस स्टेशन जुने शहर ला फिर्याद दाखल केली. परंतु त्यावर पोलीस यांनी कारवाई न केल्याने अली पब्लिक शाळेच्या प्रशासनाची हिम्मत वाढुन त्याच अहमद रजा च्या पालकांना शाळेची बदनामी केली म्हणून  जाहीर माफी मागावी अशी नोटीस बजावली. त्यामुळे जनक्षोभ उसळला व आज त्या स्कुल प्रशासन विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी तब्बल एक हजार पेक्षा जास्त पालकांनी  यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सोपविले आहे. याच निवेदनाच्या प्रतिलिपी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री, अध्यक्ष केंद्रीय अल्पसंख्याक आयोग, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, राज्य पोलीस महासंचालक मुंबई, विभागीय पोलीस महासंचालक अमरावती यांना पाठविल्या आहेत. त्यातच पोस्टमार्टेम रिपोर्ट आला असल्यावरही पोलीस जाणीवपूर्वक अली पब्लिक शाळा प्रशासन विरुद्ध कारवाई करीत नसल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.