विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या रेकॉर्ड रूमला भिषण आग…

0
68

लागलेल्या आगीत महत्वाची कागदपत्रं जळून खाक…

(प्रतिनिधी- अमोल देशमुख):- अमरावती शहराच्या कॅम्प परिसरात असलेल्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उर्ध्व वर्धा धरण विभागातील रेकॉर्ड रूमला आज पहाटे अंदाजे ४ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. हि आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहिती नुसार कॅम्प परिसरातील उर्ध्व वर्धा धरण विभागातील रेकॉर्ड रूमला आग लागली असल्याचं पहाटेच्या सुमारास परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ अग्निशामक दलाला याची माहिती देऊन पाचारण केले. मात्र तो पर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे या आगीत कार्यालयातील सर्व महत्वाचे कागदपत्रे फाईल्स, लाकडी फर्निचर, कपाट जळून राख झाले आहेत. सकाळी ६ वाजता हि आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. मात्र या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी कार्यालयातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि अनेक महत्वाची कागदपत्रे राख झाली.