Christmas Beauty Tips – स्ट्रॉबेरीने उजळावा चेहरा

0
54

ख्रिसमस सीजन थंडीचा, सेलेब्रेशनचा आणि सोबतच रसरशीत फळांचा या फळांचा शरीराला जितका फायदा होतो तितकाच त्यांचा फायदा तुमचे सौंदर्य द्विगुणीत करण्यासाठी देखील होतो. स्ट्रॉबेरी चवीला जितकी टेस्टी तितकेच सौंदर्य वर्धक आहे. न्यू इअर पार्टी आणि ख्रिसमस पार्टीला जाणार असाल तर चेहऱ्यावर विंटर ग्लो असलाच पाहिजे आणि चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी स्ट्रॉबेरीचा फेस पॅक खूप उपयुक्त आहे.

स्ट्रॉबेरीचा फेस पॅक :-  २-३ स्ट्रॉबेरीज आणि १ चमचा मध

एका छोट्या बोल मध्ये स्ट्रॉबेरीज कुस्करून त्यात मध टाकून स्मूथ पेस्ट बनवून घ्या. २ मिनिटे तयार पॅकने  चेहऱ्यावर मसाज करून हा पॅक तसाच १५ मिनिटे चेहऱ्यावर ठेवून पहिले कोमट पाण्याने व नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. हा स्ट्रॉबेरी फेस पॅक हिवाळ्यात तुमच्या चेहर्याचा ग्लो वाढवण्याच्या नक्कीच कामात येईल.