ख्रिसमस ब्युटी टिप्स: संत्र्याने खुलवा सौंदर्य

0
144

हिवाळ्यामध्ये आपल्याला संत्री बाजारात मोठ्या प्रमाणात दिसतात. आपल्या शरीरासाठी तसेच आपल्या स्कीन साठी संत्र्याचे खूप फायदे आहेत. संत्र्यात विपुल प्रमाणात असणारे विटामिन C आणि E तुमची स्कीन हेल्दी ठेवण्यासाठी मदत करते, तसेच रोज एक संत्र खाल्ल्याने वयानुरूप चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यांचा त्रास पण दूर करता येऊ शकतो. संत्र्याचा ज्यूस एक उत्तम स्कीन टोनर म्हणून देखील काम करते. ख्रिसमस पार्टीची पूर्व तयारी म्हणून आपण संत्र्याच्या सालीचा उपयोग चेहरा ग्लो करण्यासाठी कसा करता येईल ते बघू.

संत्रा टॅन रिमूव्हर पॅक:

सालीची पावडर, एक चिमुट हळद, एक टेबल स्पून मध वाटीत मीक्स करून घ्या. या तयार पॅकचा पातळ थर चेहऱ्यावर लावून ५-१०  मिनिटांनी धुवून घ्या. हा पॅक आठवड्यातून एकदा वापरल्यास हिवाळ्यात होणारे टॅनिंग नक्कीच दूर करून चेहऱ्यावर चमक आणता येईल.