गुणकारी तुळशीचे फेस पॅक्स… | Effective Basil Face Packs…

0
99

गुणकारी तुळशीचे फेस पॅक्स

त्वचा हायड्रेट करण्याकरिता फेस मास्क:

तुळशी त्वचेतील डेड स्कीन काढून कोरड्या त्वचेला मुलायम करते. याकरिता ताजी तुळस घ्यावी, ४-५ दिवसांकरिता याला मोकळ्या हवेत ठेवावे व नंतर याचे पावडर बनविण्याकरिता मिक्सर मधून ग्राइंड करावे. बनवलेले तुळस पावडर घेवून यात थोडे दही टाकावे व घट्ट पेस्ट बनवून घ्यावी. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांकरिता ठेवावे व नंतर याला स्क्रब करून धुवून घ्यावे.

रीफ्रेशिंग तुळशी पॅक:

हा पॅक बनविण्याकरिता ३०-४० तुळशीचे पाने घ्यावे यात पाणी घालून पेस्ट बनवून घ्यावा. या पेस्ट मधले संपूर्ण पाणी काढून घ्यावे. या पाण्यात थोडे बेसन टाकावे व २-३ थेंब मध टाकावे आणि व्यवस्थित मिक्स करावे. हा पेस्ट चेहऱ्याला लावावा व नंतर धुवून घ्यावा. यामुळे तुम्हाला रीफ्रेशिंग जाणवेल व त्वचा मऊसर देखील होईल.

तुळस व कडुलिंबाचा क्लीन्जिंग पॅक:

सारख्या प्रमाणात तुळशीचे व कडुलिंबाचे पाने घ्यावीत व यात थोडे पाणी टाकून याचा मिक्सर मधून पेस्ट बनवून घ्यावा हा पेस्ट बनवतांना २ लवंग देखील आपण टाकू शकता. पेस्ट तयार झाल्यास त्वचेवर लावावा व ३० मिनिटांकरिता ठेवावा(डोळ्यांभोवती लावू नये). यानंतर याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. या पॅक मुळे तुमची त्वचा फ्रेश व क्लीन होईल व पिंपल्स दूर होण्यास देखील मदत होईल.

त्वचा चमकदार बनविण्याकरिता फेस पॅक :

हा पॅक बनविण्याकरिता १ टीस्पून तुळशी चा पेस्ट, १ टीस्पून ओटमील पावडर व सारख्या प्रमाणात दुध घ्यावे व यात थोडे पाणी टाकून घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी. स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यावा व पॅक चेहर्याला लावून घ्यावा. १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. हा पॅक वापरतांना सरळ सूर्याची किरणे आपल्या चेहऱ्यावर घेवू नयेत. हा पॅक आठवड्यातून ३ वेळा तरी वापरायला हवा.

प्रत्येक त्वचेकरिता पॅक:

छोट्या बाउल मध्ये, २ टेस्पून तुळशी पावडर, १ टीस्पून मुलतानी माती, १ टेस्पून चंदन पावडर, ३-५ थेंब ऑलिव्ह ऑईल, ३-५ थेंब गुलाबाचे जल व याचा पेस्ट व्यवस्थित बनविण्याकरिता पाणी घ्यावे व पेस्ट बनवावा. हा पॅक २०-३० मिनिटांकरिता चेहऱ्यावर लावून ठेवावा व नंतर चेहरा धुवून घ्यावा.