केस गळत असतील तर काय कराल?..

0
2417

हिवाळा संपून आता उन्हाळा लागेल आणि बऱ्याच लोकांचा केस गळतीचा त्रास वाढेल; केस गळतीने बऱ्याच महिलाच काय तर पुरुष सुद्धा हैराण झालेल्या दिसून येतात. तर बरेचदा केमिकल युक्त शँम्पू, परिसरातील धूळ, प्रदूषण याने केसगळती होत असते आजच्या माझा विदर्भच्या ब्युटी सेग्मेंट मध्ये असेच साधे, सोपे आणि घरच्याघरी केसगळतीवर उपाय बघणार आहोत. खाली दिलेले उपाय करून तुम्ही नक्कीच केसांची गळती तर थांबवू शकता तसेच याने केसांचे टेक्श्चर पण सुधारण्यास मदत होते.

1. केस गळत असेल तर एक मध्यम आकाराचे डाळींब सालीसकट मिक्सरमध्ये बारीक करणे. जास्वंद फुल, १०-२० ब्राम्हीपाने, १ चमचा आवळा पावडर, मेहंदी पाने अंदाजे हे सर्व बारीक करून २०० ग्रॅम तिळाच्या तेलात लोखंडीच्या कढईत मंद गॅसवर तडतड येईपर्यंत गरम करून कोमट असतानांच एका बाटलीत भरुन ठेवावे व ते केसांना लावावे.

2. केस गळत असेल तर जास्वंद जेलने केसांची मसाज करणे.

3. कोरफड जेलने केसांची मसाज केल्यास केसातील कोंडा कमी होतो व केसांना चमक येतो.

4. डोक्यात उवा झाल्यास सीताफळ बीची पावडर तेलात मिक्स करुन केसांच्या मुळांना लावणे. तेल लावताना डोळ्यात जाणार नाही याची काळजी घेणे.

5. आवळा, हिरडा, बेरडा समप्रमाणात घेऊन याची पावडर करणे, यालाच ‘त्रिफळा चूर्ण’ म्हणतात. त्रिफळा चूर्ण (दर महिन्यात २ चमचे वाढवत जाणे) रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने केस गळती कमी होईल.

या सोबतच आहारात पौष्टिक अन्न घ्यावे. प्रोटीन, व्हिटामिन आणि कॅल्शियम जास्त प्रमाणांत असणारे पदार्थ खावेत.