बोटांवर उमटणाऱ्या रिंग मार्क्स करिता टिप्स..| How To Get Rid Of Ring Marks

0
64

|…बोटांवर उमटणाऱ्या रिंग मार्क्स करिता टिप्स..|

बोटांमध्ये खूप काळासाठी अंगठी घातल्यामुळे आपल्या बोटांभोवती मार्क्स उमटतात. जर या मार्क्सला तुम्ही इग्नोर करत असाल तर हे पर्मनंट होऊ शकतात. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची तुम्हाला गरज आहे.

या रिंग मार्क्स मुळे काही लोक रिंग घालत नाहीत पण हा यावरील उपाय नाही. या रिंग मार्क्स करिता काही सोप्या टिप्स खाली दिल्या आहेत ज्याचा उपयोग करून तुम्ही रिंग मार्क्स पासून सुटका मिळवू शकता.

१. रिंग मार्क्स असलेल्या भागाला रोज स्क्रबिंग करावे, हा उपाय मृत पेशींपासून मुक्त करून ग्रासित भाग डार्क करतो.

२. घरून बाहेर निघण्या अगोदर नेहमी सन्सस्क्रीन लोशन लावूनच बाहेर जावे. यामुळे टॅन होण्याची शक्यता कमी होईल व रिंग मार्क्स तयार होणार नाही.

३. रिंग मार्क्स करिता लिंबू व मधाचे मिश्रण लावावे. १५ मिनिटांकरिता लावून नंतर धुवून घ्यावे. हा उपाय आठवड्यातून तीन वेळा केल्यास रिंग मार्क्स पूर्णपणे नाहीशे होतील.

४. नेहमी मॅनिक्युर करावे. मॅनिक्युर तुम्ही पार्लर सोबतच घरी देखील करू शकता. मॅनिक्युर करणे रिंग मार्क्स पूर्णपणे नाहीशे करतो.

५. रोज आपल्या बोटांना मॉईश्चराइज करावे. हर्बल मॉईश्चराइजर वापरणे उत्तम आहे, यामुळे आपली त्वचा देखील हायड्रेट राहील.

या होत्या बोटांवरील रिंग मार्क्स दूर करण्याच्या काही घरगुती सोप्या टिप्स. अश्याच काही सोप्या टिप्स आपल्याला मोबाईलवर हव्या असतील तर आम्हाला ९७६४४४४१३४ वर व्हॉट्सअॅप्प करा.