टॅन त्वचेकरिता फेस पॅक…| Tan Reducing Face Packs

0
86

टॅन त्वचेकरिता फेस पॅक…

संत्र, लिंबू व दुधाचा फेस मास्क…

१ टेस्पून संत्र व लिंबाच्या छीलक्याचे पावडर घ्यावे व १ टेस्पून कच्चे दुध घ्यावे. दोन्ही साहित्यांना व्यवस्थित मिक्स करून याचा घट्ट पेस्ट तयार करावा. तयार झालेला पेस्ट चेहऱ्याला लावून १० ते १५ मिनिटांकरिता ठेवावे व नंतर कोमट पाण्याने धुवून घ्यावे. याचा चांगला फायदा तुम्हाला दिसून येईल.

साखर, ग्लिसरीन आणि लिंबाचा फेस पॅक…

१ टेस्पून साखर, १/२ टीस्पून ग्लिसरीन, १ टेस्पून लिंबाचा रस घेऊन हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून याचा पेस्ट तयार करून घ्या. हा पॅक स्क्रब प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर वापरावा, ३-४ मिनिटे सतत स्क्रब करावे व स्क्रबिंग झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्यावे. यामुळे तुमची त्वचा उजळून दिसेल.

टॅन त्वचेकरिता केळाचा फेस पॅक…

यासाठी तुम्हाला १ टेस्पून दुध, १ टेस्पून लिंबाचा रस, १/२ केळ लागेल. केळ व्यवस्थित मॅश करून यात दुध व लिंबाचा रस टाकून चांगले मिक्स करावे. हा पॅक आपल्या शरीराच्या टॅन झालेल्या भागांवर लावावा व १५ मिनिटे ठेवावे नंतर धुवून घ्यावे. या फेस पॅकमुळे तुमची टॅन त्वचा उजळून दिसेल.

टॅन त्वचेकरिता बेसन चा फेस पॅक…

२-३ टेस्पून बेसन, १ टीस्पून लिंबाचा रस, १ टीस्पून ऑलिव्ह ऑइल व चुटकीभर हळद घ्यावी. सर्व साहित्य एकत्र करून स्मूथ पेस्ट तयार करून घ्यावी. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावून १०-१२ मिनिटांकरिता ठेवावे त्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्यावे.