आज जागतिक छायाचित्र दिन

1
13914

(भाग्यश्री घोडे)–

photo
Photo By : Mayur Umredkar

आज जागतिक छायाचित्र दिन, आज पासून १७७ वर्षा आधी १८३९ मध्ये फोटोग्राफीची सुरुवात झाली. फ्रांस ने १८३९ ला या आविष्काराला मान्यता दिली. म्हणूनच १९ ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिनच्या रुपात साजरा करतात. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रुपात कैद केले व त्यांना नेहमीसाठी स्मरणात ठेवले.

photo2
Photo By : Mayur Umredkar

प्रकृतीने प्रत्येक प्राणीला जन्मत: एक कॅमेरा दिला आहे, ज्यामुळे ते प्रत्येक वस्तूच्या छवीला आपल्या डोक्यात अंकित करू शकते आणि तो कॅमेरा म्हणजे आपले डोळे. तस पाहिलं तर प्रत्येक प्राणी एक फोटोग्राफर आहे. वैज्ञानिक दृष्टीने माणसाने आपले साधन वाढविण्यास सुरुवात केली आणि अनेक आविष्कारा सोबत कृत्रिम लेन्सचा पण अविष्कार झाला. वेळे सोबत समोर चालतांना या लेन्सच्या छायाचित्रांना स्थाई रुपात समोर आणले. याच प्रवासाच्या यशाला आपण ‘फोटोग्राफी डे’च्या रुपात साजरा करतो.

photo3
Photo By : Mayur Umredkar

काही वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागायची,  काळ बदलला आणि छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल असा हा प्रवास होत गेला आणि आता टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले आहे.

photo1
Photo By : Mayur Umredkar
जे शब्दात लिहिता येत नाही, जे बोलण्यातून व्यक्त होत नाही, ते या छायाचित्रांच्या माध्यमातून न सांगता व्यक्त होत असते, छायाचित्रकार म्हणजे तो जो साधे दिसत असलेले दृश्यही बोलके करतो. अशा या जागतिक छायाचित्र दिनी त्या सर्व छायाचित्रकारांना ‘माझा विदर्भ’कडून खूप खूप शुभेच्छा…