हक्काच्या नगर पंचायतीसाठी गावकऱ्यांचा १५ दिवसांपासून अनिश्चित कालीन आंदोलन…

0
236

(प्रतिनिधी- लोकेश मोटघरे):- राज्य आणि केंद्र सरकारने गोंदिया जिल्ह्यातील तालुक्यांचा विकाश व्हावा म्हणून २०१५ मध्ये तालुका स्तरावरील ग्राम पंचायतीचे विसर्जन करून नगर पंचायतीची निर्मिती केली. मात्र गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द ग्राम पंचायतीला नगर पंचयतीचा दर्जा देण्या ऐवजी सालेकसा तालुक्यातील आठ लहान गावांना एकत्र करत सालेकसा नगर पंचायत तयार केली असल्याने तसेच केंद्र आणि राज्य सरकारची २५ च्या वर कार्यालये ही आमगाव खुर्दच्या हद्दीत असून सुद्धा नगर पंचायतीचा दर्जा न दिल्याने तालुक्याचा विकास होऊ शकला नाही. आमगाव खुर्द ग्रामपंचायतीला सालेकसा नगर पंचायतीत समाविष्ट करावा या मागणीसाठी गावकऱ्यांनी मागील १५ दिवसा पासून तहसील कार्यलया समोर आंदोलनाला सुरवात केली आहे.

सालेकसा तालुक्यातील सर्व महत्वाची शाशकीय कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, महाविद्यालय, रेल्वे स्टेशन हे आमगाव खुर्द ग्राम पंचायतीच्या हद्दीत आहे. यासाठी आमगाव खुर्द ग्राम पंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी २०१५ मध्ये आमगाव खुर्द वाशीयांनी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने या ठिकाणी निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे आमगाव खुर्द वासियांनी न्यायालयात धाव घेतेली असता न्यायालयाने आमगाव खुर्द ग्राम पंचातीच्या बाजूने निकाल दिला. मात्र स्थानिक आमदार संजय पुराम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले की, सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक न घेतल्याने तेथील पदाधीकार्यांवर अन्याय होईल असे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले असून न्यालयाच्या आदेशाची अवहेलना करत आणि चुकीची माहिती पुरविल्याने २०१७ मध्ये सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक पार पडली. मात्र सालेकसा नगर पंचायतीत आठ छोट्या गावाचा समावेश असल्याने तालुका मुख्यालयाचा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे आमगाव खुर्द वासियांनी सालकेसा नगर पंचायतीत आमगाव खुर्द ग्राम पंचायतीचा समावेश करावा तेव्हाच तालुक्याच्या विकास होईल यासाठी अनिश्चित कालीन आंदोलन पुकारले आहे.