६.५५ लाखाच्या बनावट दारू मालासह दोघांना अटक…

0
45

(प्रतिनिधी- नागपूर):- राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या निरीक्षक ‘ब’ विभागाच्या वतीने मानेवाडा परिसरात ढाब्यावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत ६.५५ लाख रुपयाच्या विदेशी मद्यासह दोन इसमांना अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क ‘ब’ विभागाचे निरीक्षक प्रशांत गोतमारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन हुडकेश्वर अंतर्गत मानेवाडा रिंग रोड परिसरात पाळत ठेवून अजय अशोकराव शेंडे यास ॲक्टीव्हा गाडी व बनावट मद्यासह ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याच्या आकाश नगर येथील घरातून विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्यांची झाकणे व लेबल जप्त करण्यात आले आहे. सोबत अजय शेंडे चा मेहूणा आशिष माणिकराव दरोटे याच्या अजनी परिसरातील घरातून बनावट विदेशी मद्य साठ्यासह वाहतुकीकरिता वापरण्यात येणारे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १८० मिलीच्या १४३४ बनावट मद्याच्या बाटल्या(३० पेटी), १५०० बनावट झाकणे व लेबल, बनावट विदेशी दारु बॉटलींगचे साहित्य असा एकूण ६ लाख ५५ हजार ४७२ रुपयाच्या मुद्देमालासह वरील दोघांना अटक करण्यात आली. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक स्वाती काकडे व उपअधीक्षक मिलींद पटवर्धन यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक प्रशांत गोतमारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक चंदु दरोडे, जवान धवल तिजारे, विनोद डुंबरे, सुधीर मानकर, रेश्मा मते, समीर सईद व शिरीष देशमुख यांनी केली.