नागपूर मनपाचा २४ तास पाणी देण्याचा दावा ठारणार फोल!

0
47

(प्रतिनिधी- नागपूर):- नागपूर शहरातील ऑरेंज सिटी नेटवर्कमध्ये ६६ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर शहराच्या बाहेरील भागातील मनपाच्या हद्दीत तब्बल २६७ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नागपूर शहरात एकीकडे टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे, तर दुसरीकडे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात गेल्या ५० वर्षांत जाणवली नाही, एवढी भीषण पाणी समस्या नागपूरकरांना भेडसावणार असल्याची भीती मनपाचे विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे यांनी व्यक्त केली.

Nagpur Water Crisis
NMC Water Supply

पाणी समस्येवर मात करण्यासाठी शहरातील विहिरी स्वच्छ करून त्यामधील पाण्याचा वापर करावा, असे पत्र मनपा आयुक्त आणि महापौरांना दिल्याचे वनवे यांनी दिले. मात्र याबाबत मनपाकडून अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याचे वनवे यांनी सांगितले. उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास होऊ नये, यासाठी पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ऑरेंज सिटी वॉटरचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांनी सांगितले. महापालिकेत रोज ३३३ टॅंकरच्या पाण्यावर नागरिकांची तहान भागवली जात आहे. त्यामुळे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस पाणी पुरवठ्याबाबतच्या महापालिकेच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे येणारा तापक उन्हाळा लक्षात घेता नागपूरकरांनी पाण्याचा अपव्यय करतांनी विचार करणे महत्वाचे झाले आहे.