नागपूरच्या क्रीडा मंदिरातील जुगार अड्ड्यावर धाड, २७ जणांना अटक…

0
37

(प्रतिनिधी- नागपूर):- नागपूरच्या छोटा ताजबाग परिसरातील रघुजी नगर, सक्करदरा याठिकाणी चालत असलेल्या फुलसिंग नाईक क्रीडा मंदिर येथे मागील अनेक दिवसांपासून जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी कारवाई करून याठीकानाहून २७ जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागपुरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे चालत असून पोलिसांनी यावर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांनी ३ वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल आणि हुक्का समान जप्त करण्यात आला आहे. सक्करदरा परिसरातील फुलसिंग क्रीडा केंद्रावर जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून लाखो रुपयांसह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. सोबतच जुना कामठी गोल बाजार आणि नवीन कामठी येथील इस्माईल पुरा याठिकाणी पोलिसांनी धाड टाकून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. कामठी येथील हे दोन्ही जुगार अड्डे जेरु यांच्या मालकीची असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.