बोगस परीक्षार्थी बसवून सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्या १५ अधिकाऱ्यांना अटक…

2
174

(प्रतिनिधी):- सर्वात मोठी आणि महत्वाची अशी उच्च पदाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बोगस परीक्षार्थी बसवल्याचा धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील १५ सरकारी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असल्याचे समजते आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षेमध्ये बोगस परीक्षार्थी बसवल्याचा प्रकार उघडकीस आला असून यातील बोगस परीक्षार्थींच्या माध्यमातून सरकारी सेवा मिळवणाऱ्या १५ सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने ही कारवाई केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये ४०० जणांनी बोगस परीक्षार्थी म्हणून परीक्षा दिल्याचा संशय आहे. त्यापैकी ४० जणांना सरकारी सेवेचा लाभ झाला आहे. या ४० जणांपैकी १५ जणांना काल राज्याच्या विविध भागातून अटक करण्यात आली. हे सर्व सरकारी सेवेतील वरिष्ठ अधिकारी असल्याची माहिती आहे.