अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पोलीस ठाणेही होणार ‘हाय-फाय’…

0
91

(प्रतिनिधी- नागपूर):- काल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभ्त मांडला. यावेळी सबका साथ सबका विकास अंतर्गत हा अर्थसंकल्प असल्याचे दिसत होते. यामध्ये महराष्ट्र पोलीस ठाण्यांसाठी देखील मोठी तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांना आह्य फाय करण्यासाठी मोठी तरतूद या मध्ये करण्यात आली आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलिस दलाचे आधुनिकीकरण व बळकटीकरण ह्यासाठी १३ हजार ३६५ कोटी ३ लक्ष इतकी भरीव तरतूद यामध्ये करण्यात आली. राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये येणा-या अभ्यागतांचे काम वेळेत व समाधानकारकरित्या होण्याकरिता अभ्यागत प्रवेश व्यवस्थापन प्रणाली राबविणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या ई- गव्हर्नन्स योजनेसाठी रू. ११४ कोटी ९९ लक्ष निधीची तरतूद करण्यात आली. पोलिस ठाणे व त्यांच्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था यावर योग्य देखरेख व नियंत्रण राहण्यासाठी सर्व पोलिस ठाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडल्या जाणार. ह्यासाठी १६५ कोटी ९२ लक्ष रू. निधीची तरतूद याम्ह्द्ये आहे. सीसीटीएनएस प्रकल्पाद्वारे राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रातील गुन्हेगार व गुन्हेगारीची अचूक माहिती संकलित करत त्या माध्यमातून पोलिस ठाणी व न्यायालय तसेच अभियोग संचालनालय, न्याय सहाय्यक प्रयोगशाळा ह्यांच्यात समन्वय साधण्यासाठी गुन्हे अन्वेषण संगणक प्रणाली विकसित करणार असल्याची माहिती आहे, यासाठी २५ कोटी रू. निधीची तरतूद करण्यात आली आहे.