मनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…!!!

3
14534

 

love

एक वेडं मन….!!!!

राहुल खूप रागीट स्वभावाचा खूप जास्त चिडकर प्रवृत्तीचा. त्याचा हा रागीट स्वभाव लहान पणापासूनच… मोठा झाला तरी त्याचा रागीट स्वभाव कमी होई ना… तो मुळातून जसाचा तसाच….कॉलेजमध्ये सगळ्यांवर त्याचा जोर असायचा पूर्ण कॉलेज त्याचा नावाने घाबरायचे… पण स्वभावाने तसा तो चांगला. कोणाचीही मदत करायला नाही नव्हता म्हणत. कोणीही त्याच्याकडे मदतीचा हात समोर केला तर त्याला तो मदत करायचा. म्हणूनच तो सर्वांना आवडायचा… चांगल्या लोकांसोबत तो चांगला असायचा आणि वाईट लोकांना सोडायचा नाही. असा राहुलचा स्वभाव..त्याच्या कॉलेजमध्ये स्वाती नावाची एक मुलगी होती. स्वातीला राहुल फार आवडायचा पण त्याच्या रागीट स्वभावामुळे तिला त्याच्या सोबत बोलायची हिम्मत कधी झाली नाही.

heartपण एक दिवस खूप मोठी हिम्मत करून स्वातीने त्याला हाय म्हंटलं…. व त्याने फक्त तिच्या कडे बघितले, व तिथून निघून गेला. स्वाती घरी आली… रात्र झाली… स्वातीला रात्रभर  झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा त्याचा सोबत बोलण्याचा प्रयत्न केला…  चेहरा प्रफुलीत असं स्मित देत तिने त्याला हाय म्हंटलं…राहुल ने स्वातीकडे हलक्या नजरेने बघून हाय…म्हणून तिथून निघून गेला. स्वाती फार आनंदित झाली…मग असं दररोज कॉलेजमध्ये हाय- हॅलो  सुरु झालं…हाय…. पासून झालेली सुरवात मैत्रीत झाली… राहुल व स्वातीमध्ये आता घट्ट मैत्री झाली. ते दोघे एकमेकांना चांगलेच ओळखायला लागले.  दररोज एकमेकांना भेटायला लागले… आणि मग काय…. तर दररोज गार्डनमध्ये जाणे…सोबत सिनेमा बघायला जाणे…एकमेकांच्या आवडी-निवडीच्या वस्तू घेणे शॉपिंग करणे अशा गोष्टी राहुल आणि स्वातीमध्ये होत गेल्या… हळू-हळू त्या दोघांची मैत्री जास्त बहरत गेली… दोघांना एकमेकांचा सहवास हवा-हवा सा वाटू लागला. आणि राहुलला स्वाती आवडू लागली…आणि राहुल ने एकेदिवशी स्वातीला प्रपोज केलं. त्यावेळेला स्वातीचा आनंद पाहण्याजोगा होता, ‘हयाकी शोकीयाँ लीपटी है आँचल से’…’ऐसा लागता है आज स्वाती हवामे है’ जणू अशीच काही तरी अवस्था  स्वातीची होती…स्वाती याच दिवसाची वाट बघत होती…कारण स्वातीला राहुल कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच आवडायचा ती फार आनंदी झाली. तिने त्याला घट्ट मिठी मारली… आणि म्हणाली राहुल I LOVE U – 2  स्वातीने राहुलला तेव्हाच होकार दिला. आणि सांगितलं की कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच तू मला आवडायचा पण तुझ्या रागीट स्वभावामुळे माझी हिम्मत नव्हती होत, तुला सांगायची… तेव्हा पासंनच दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायला लागले.
niropत्यांचा प्रेमाचा बहर….. बहरतच जात होता. त्यावेळी राहुलला स्वातीसाठी काय करू काय नाही असे झाले होते. त्याने स्वातीच्या प्रेमामुळे स्वत:चा रागीट स्वभाव देखील सोडला होता. त्याने फाल्तूची लफडी पण करणे सोडली होती. आधीचा राहुल कुठे तरी हरविला होता. हा राहुल पूर्ण पणे स्वातीच्या प्रेमामध्ये परिवर्तीत झाला होता. दोघांचही प्रेम एकमेकात रंगू लागले होते. पण म्हणतात ना सुखाचे क्षण फार काळ नसतात… त्या दोघांचं एक होणे नियतीला मान्य नव्हतं. काही काळानुरूप त्यांच्या दोघांच्या प्रेमाला काळ्या अंधाराने माखून टाकलं.. राहुल स्वातीवर खूप प्रेम करायचा पण तो तिच्यावर संशय करायचा.. त्यांचे प्रमाचे काही दिवस फार छान गेले. दोघे पण नेहमी आनंदी असायचे दोन दिवस गेले की तो स्वातीशी संशय घेऊन भांडायचा. हे असं त्याच नेहमीच चालू असायचं कुठलेही कारण असो तो स्वातीशी भांडला की ब्रेकअप करून टाकायचा. दोन दिवसानंतर पुन्हा जवळ जायचा त्याला असं वागायची सवय झाली होती.

राहुल ने स्वातीशी चार- पाच वेळा ब्रेकअप केला होता. स्वाती त्याच्या अशा वागण्याने पूर्ण पणे वैतागून गेली होती. कंटाळून गेही होती. या सर्व गोष्टींचा तिला खूप त्रास व्हायला लागला. तिने एक दिवस ठरवले असा नेहमी नेहमी ब्रेकअप होण्यापेक्षा एकदाच दूर झालेलं बर दररोजचा त्रास सहन करण्यापेक्षा एकदा सर्व संपविलेले बर.. स्वातीने राहूलला फोन केला आणि त्याला सांगितले, मी कंटाळले तुझ्या ह्या अशा वागण्याने. तू मला मनातून विसरून जा… आणि जगू दे मला.. तू तुझ्या पद्धतीने आयुष्य जग नको त्रास देऊ मला. मी नाही सहन करू शकत या सगळ्या गोष्टी. इतकं बोलुन स्वातीने फोन ठेऊन दिला. पण राहुल मात्र, राहावे ना… त्याला विश्वास नव्हता बसत… की त्याची स्वाती त्याला हे सगळं मनातून बोलली असेल म्हणून तो स्वातीवर खूप जास्त प्रेम करायचा… स्वातीच बोलणं तो सहन नाही करू शकला. जागेवर कोसळून रडू लागला.

signal

दुसऱ्या दिवशी त्याने स्वातीला फोन करून म्हटलं, स्वाती तू जे काही फोन वर काल माझ्या सोबत बोलली ते माझ्या समोर येऊन बोल… मला बघायचं आहे… तुझ्या डोळ्यात माझ्या प्रेमाला नाकारण्याच सत्य….स्वातीने राहुलला भेटायला होकार दिला.. ते दोघे त्यांच्या नेहमीच्या जागेवर दुसऱ्या दिवशी भेटतात. स्वाती राहुल कडे पाठ फिरवून उभी राहते. आणि फोन वर बोललेली सर्व त्या भेटीत बोलून टाकते. राहुल तीचं बोलणं ऐकून हसायला लागतो. स्वातीला पुन्हा राग येतो… आणि स्वाती तिथून निघून जाण्याच्या प्रयत्नात असते तेव्हा राहुल बोलतो. स्वाती थांब माझ्याकडे बघ गं… एकदा माझ्या डोळ्यात बघून सांग मला… चुकलो मी मान्य करतो. मात्र, एकदा बघं तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्याविना नाही राहू शकत. ती त्याचं ऐकून न भेटता निघून जात असताना ती थोड्या समोर जाऊन थांबते तिच्या लक्षात येते… तिला एक गोष्ट सतावत असते, ती म्हणजे इतक्या रागीट स्वभावाचा राहुल आज चूप कसा राहिला. एकही शब्द न बोलता माझं बोलणं चूपचाप कसे ऐकून घेतले. ती तेव्हा शांत होते, आणि तितेच थांबते, आणि तिला काही तरी अनर्थ होणार असा भास होतो.  ती राहुलच्या दिशेने धावत जाते. राहुल एका दगडावर डोक ठेवून पडलेल्या स्थितीत तिला दिसतो. त्याच्या जवळ जावून त्याला हात लावून हाक मारते.. तर काय… राहुल मृत अवस्थेत तिला आढळतो.  त्याचं डोकं तिच्या मांडीवर पडतं. तिला तर काही सुचेनास होते, ती किंचाळते ओरडते आक्रोश करून रडायला कागते. राहुल उठ ना रे… राहुल उठ ना रे.. sorry राहुल उठ Please  मी आता असं नाही वागणार… तुला सोडायच्या गोष्टी कधी नाही करणार Please राहुल उठ मी तुझ्या विना नाही राहू शकत राहुल उठ….

राहुल स्वातीवर खूप प्रेम करायचा तो तिच्या शिवाय जगण्याचा विचारही नव्हता करू शकत. स्वाती जेव्हा त्याला ह्या सगळ्या गोष्टी फोन वर बोलली होती. तेव्हाच तो पूर्ण पणे संपला होता. तो जगू शकत नव्हता स्वाती शिवाय. त्याने तेव्हाच स्वतःला संपविण्याचा विचार केला. आणि विष पिवून स्वातीला भेटण्यासाठी गेला. आणि स्वातीशी बोलत असतानाच पूर्ण विष त्याच्या शरीरात पसरून गेले होते. हे सर्व स्वातीला कळेपर्यंत खूप उशीर झाला होता. सगळ संपलं होतं. चार वर्षाचं प्रेम एका मिनिटात संपून गेलं… स्वातीपण आता स्वाती राहिली नाही.. ती पूर्ण पणे वेडी झाली.. ह्या सगळ्या प्रकाराच्या गुन्ह्याची गुन्हेगार ती स्वत:ला मानू लागली.. आता ती दररोज त्या जागेवर जाऊन बसते व खेळणी सोबत खेळत असते. ती तिच्या बहुल्यात राहुलला बघते आणि दिवस भर त्याच्याशी गप्पा मारत असते. राहुल उठ ना रे …..!!!!!!!!