फर्निचरच्या दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान…

0
84

(प्रतिनिधी- अजिज शेख):- वर्धा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या वडनेर पो.स्टे. हद्दीतील पोहना या गावातील ईलेक्ट्रीकल व फर्निचर दुकानाला शार्ट सर्किटमुळे आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली.
पोहणा येथे त्रिलोकचंद सोहनलाल कटारिया (जैन) यांचे गुरुकृपा ईलेक्ट्रिक व फर्निचरचे दुकान असून ते यांचा मुलगा ललित हा चालवित असतो. सोमवारी संध्याकाळी ६ वाजताचे दरम्यान मुलगा ललित हा घरी गेला असता त्याचे वडील त्रिलोकचंद हे दुकानात बसून होते. साडे सात वाजताचे दरम्यान त्यांना लघुशंका आल्याने ते दुकान सोडून बाहेर गेले असता दुकानात आग लागली. परत आल्यावर त्यांना दुकानासामोर लोकांची गर्दी दिसून आल्याने ते घाबरले. दुकानात आले असता आग लागल्याचे दिसून येताच उपस्थित नागरिकांच्या मदतीने ती आग विझविण्यात आल्याने मोठे नुकसान होता होता येणारे संकट टळले. दुकानात कुणीही नसल्याने ही आग शार्ट सर्किटनेच लागली असून या घटनेत त्यांचे जवळपास पाच लाखाचे नुकसान झाले आहे असे त्यांचे म्हणणे आहे. या घटनेची नोंद वडनेर पो.स्टे.येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.