पोलीस बंदोबस्तात जलवाहिनी चे काम सुरु, ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात…

0
65

पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता…

(प्रतिनिधी- जयवंत देशमुख):- यंदा वाशिम जिल्ह्यात कमी प्रजन्यमानामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात पाणी पातळी कमालीची घटली. त्यामुळे शहराला पाणी मिळावे यासाठी पैनगंगेवरील बॅरेज मधील पाणी साठा शहराला नेण्याचा घाट जिल्हा प्रशासनानं घातला आहे. परंतु २५ गावातील ग्रामस्थांनी याला विरोध केल्यामुळे तगड्या बंदोबस्तात जलवाहिनचे काम सुरू करण्यात आले आहे.
गावकऱ्यांचा प्रचंड विरोध असतांना एकही लोकप्रतिनिधी गावात आला नसल्यामुळे संतप्त होऊन मुख्यमंत्री महोदय आमचे खासदार आणि आमदार दाखवा आणि १०० रुपये मिळवा असे फलक लावून लोकप्रतिनिधीचा निषेध याठिकाणी केला जात आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच पाणी शहराला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. यासाठी शेतकऱ्यांना मागील अनेक दिवसांपासून आंदोलनही केले. तरीही यावर तोडगा काढायला प्रशासनाला यश आलं नाही. शेतकऱ्यांच्या हक्काच पाणी शहराला जात असल्याने हा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा असंतोष लक्षात घेता जलवाहिनीचे काम मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आले आहे.