शॉक लागुन सासु सुनेचा मृत्यु… कपडे सुकवणे पडले महागात…

0
126

(प्रतिनिधी : रवी जोशी):-  यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील कुंभा येथे विजेचा शॉक लागुन सासु सुनेचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना  आज सकाळी सातवाजे सुमारास घडली.  सुनिता मोहुर्ले आणि शकुंतला मोहुर्ले असे या दुर्दैवी महिलांचे नाव आहे . घरासमोर बांधलेल्या तारेवरचे वाळत टाकलेले कपडे काढायला गेलेल्या सुनीताला तारेत विद्युत प्रवाह असल्याने तिला जोराचा धक्का लागला . तिला वाचवायला तिची सासु शकुंतला गेली असतांना त्यांनाही विजेचा शॉक लागला . या दोघांना वणी ग्रामीण रुग्णालयात तातडीने नेण्यात आले पण दुर्दैवाने रुग्णालयात दाखल करण्याच्या आधिच या दोघींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुंभा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.(DeathDueTo Shock)