यवतमाळ पीककर्ज आढावा बैठकीत किशोर तिवारी यांनी केली कानउघाडणी

0
123

(प्रतिनिधी : रवी जोशी):- उमरखेड येथील पंचायत समितीमध्ये पीककर्ज आढावा बैठक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घेतली. त्यावेळी त्यांच्या समवेत आ. राजेंद्र नजरधने, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार भगवान कांबळे, बिडीओ जयश्री वाघमारे व इतर अधिकारी उपस्थित होते.

अतिशय धक्कादायक वास्तव या बँक मॅनेजर,नोडल अधिकारी यांचे आढावा बैठकीतून समोर आले. ५० हजार शेतकाऱ्यांपैकी ५  हजार शेतकऱ्यांनी कर्ज मागणी कागदपत्रे दिली असून आजपर्यंत सर्व सरकारी बँकांनी मिळुन फक्त ४७३ शेतकऱ्यांना कर्ज दिले. या पीककर्ज वाटपाच्या उदासीन धोरणाविरुद्ध किशोर तिवारी यांनी बँक अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली, परंतु बँकेचे काही अधिकारी एवढे मुजोर झालेत की, कोणी तर बैठकीला आलेच नाही तर आलेल्या अधिकाऱ्यांनी थातूरमातुर माहिती बैठकीत दिली.
शेतकरी योजना राबविण्यात बँक अधिकारी, कृषी अधिकारी हे  शेतकऱ्यांना अतोनात त्रास देत असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी निदर्शनात आणून दिले, पण त्यावर बँक अधिकारी मात्र ‘टाईमपास’ धोरण अवलंबत असल्याचे चित्र आहे.
एकूणच या अडवणूक धोरणामुळे शेतकऱ्यांना मात्र सावकार दारी अथवा आत्महत्येचा उंबरवढ्यावर जाण्याची वेळ मात्र आल्याचे चित्र आहे.