पालकमंत्री येरावर यांनी घेतला उमरखेड येथे कार्यकर्ता मेळावा…

(प्रतिनिधी- रवी जोशी):- यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे महागाव विधानसभा क्षेत्रातील बूथ प्रमुखांचा मेळावा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांचे मार्गदर्शनात पार पडला. यावेळी मंचावर आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार उत्तमराव इंगळे, नगराध्यक्ष नामदेव ससाणे नितीनजी भुतडा यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री मदन येरावार यांनी सरकारच्या वतीने चालणाऱ्या विविध योजना त्यांची उपलब्धी याविषयी सखोल माहिती कार्यकर्त्यांना देत हे सर्व विषय जनतेपर्यंत पोहचविण्याचे सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिक यासभेला उपस्थित झाले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांशी सखोल माहिती घेतली आणि शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन देखील केले.