घाटंजी तालुक्यात अल्पवयीन मुलीचा २ युवकांनी केला विनयभंग….

0
92

(प्रतिनिधी- रवी जोशी):- यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील ससाणी या गावात एका अल्पवयीन मुलीचा २ युवकांनी मिळून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यावरून दोन्ही आरोपीच्या विरोधात लैगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून पोलीसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

घाटंजी तालुक्यातील ससाणी येथे काल दि. १२/०३/२०१८ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान गावाजवळील शेतात पिडीतेची लहान बहिण शौचाला गेली असता सोबत काही अंतरावर पिडीत मुलगी(वय १७ वर्ष) उभी होती. त्यावेळी गावातीलच दोन युवक गोलू दत्ता रोकडे(२०) आणि चंद्रभान नारायण लेनगुरे पिडीतेचा पाठलाग करत त्या ठिकाणी पोहचले. पिडीत त्याठिकाणी उभी असतांना आरोपी चंद्रभान याने या मुलीचा मागून येवून तोंड दाबला व आरोपी गोलू याने पिडीत मुलीचा हात धरून ओढत नेले व जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी लहान बहिणीने आरडा ओरड केली असता मुलीचे मामा व काका तेथे धावून आले. त्यांना येतांना पाहून आरोपींनी तेथून पळ काढला आणि फरार झाले. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून घाटंजी पोलीसांनी आरोपी विरुद्ध कलम ३५४, ३५४(अ), ड ३४ भा.द.वि. पो.स्को.बालकाचा लैगिक अत्याचारपासून संरक्षण अधिनियम कलम ८ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा प्रमाणे नोंद करून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सदर प्रकरणाची कारवाई SDPO पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गणेश भावसार करीत आहेत. यासंबंधीची माहिती आमचे घाटंजी व्हिडीओ ग्राफिक प्रतिनिधी संजय ढवळे यांनी दिली आहे.