गाडीने खाल्ल्या तीन पलट्या, मात्र पोलिसांच्या तत्परतेने सगळे सुखरूप….

0
128

(प्रतिनिधी : रवी जोशी):- यवतमाळ नागपूर बोरी तुळजापूर महामार्गावर उमरखेड नजीक, वन उपज नांदेड रोड नाक्याजवळ MH 13 CS 3479 या ब्रेझा गाडीच्या चालकाचा ताबा सुटून रस्त्यालगत असलेल्या, कापलेल्या लिंबाच्या खोडावर आदळून गाडीने तीन पलटी खाल्या. हे वृत्त कळताच उमरखेड पोलीस स्टेशन चे पिएसआय संगीता हेलोडे,व चालक अमोल सातपुते यांनी त्वरित घटनास्थळी गाठले. गाडीतील जखमी सतीश कटबिहार, महानंदा सोलापूर,निर्मला कळसे, महादेवी गोपगोर, कसुरबाई खजूरगे रा. सोलापूर यांना तातडी ने बाहेर काढून उत्तरवार रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून नांदेड ला रवाना केले. गाडीतील एअर बॅग उघडल्याने व पोलिसांनी तत्परता दाखवल्यानेच सर्वांचे प्राण वाचले. पोलिसांची हि मदत प्रशंसनीय आहे.