भूमिलेख कार्यालयाच्या रिटायर्ड कर्मचाऱ्याची आत्महत्या…

0
71

(प्रतिनिधी- रवी जोशी):- यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी येथील रिटायर्ड कर्मचाऱ्याने शेतात असलेल्या झाडाला लटकून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली असल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे.

घाटंजीतीलइस्तरी नगर मध्ये राहणारे मारोती अंबादास मोरे वय वर्ष ६० हे भुमिलेख कार्यालयातून २ वर्षापूर्वी निवृत्त झाले होते. मागील २ महिन्यापूर्वी त्यांनी घाटंजी मधील सरकारी दवाखान्याच्या मागे शेती घेतली होती. परंतु त्यांचे मानसिक संतुलन मात्र ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी आज दि. १३/०३/२०१८ ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेतात निंबाच्या झाडाला लटकून आत्महत्या करून जीवन यात्रा संपविली. घाटंजी परिसरात आत्महत्या विनयभंग अश्या सततच्या घटनेमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.  मारोती मोरे यांच्या आत्महत्या संदर्भात पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहेत. याची माहिती घाटंजी व्हिडीओ ग्राफिक प्रतिनिधी संजय ढवळे यांनी दिली आहे.