यवतमाळात महसूल प्रशासनाच्या कारवायांचा सपाटा…

0
81

(प्रतिनिधी- रवी जोशी):- यवतमाळ जिल्ह्यात महसूल प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून रेतीमाफियांवर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. महसूल विभागाच्या कारवाईने अनेक अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यातील उमरखेड महसूल प्रशासनाकडून अवैध गौण खनिज व रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका प्रसासनाने सुरु केला आहे. त्यामुळेच सर्वत्र खळबळ उडाली आहे. या कारवाईत महसूल प्रशासनाने अवैध उत्खनन करणाऱ्या JCB धारकास ७ लाख ९५ हजार ५१५ रुपयांचा दंड ठोठावला आहे. यावेळी वारंवार रेती चोरी करणारे दोन टिप्पर जप्त केले आहे. यापुढेही अवैध उत्खनन व रेतीमाफियांच्या अवैध कृत्यावर फौजदारी, दंडात्मक कारवाई उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांचे मार्गदर्शनात करणार असल्याचे तहसीलदार भगवान कांबळे यांनी सांगितले आहे.